चाळीसगाव ; शहरातील रहिवासी तरुण शिवशक्ती नगर परिसरातून येत असताना रविवार ता.२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास त्याच्या गळ्यावर मांजामुळे त्याचा गळा चिरल्या गेला घटनास्थळावरून नागरिकांनी त्याला उपचारासाठी शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, शिवशक्ती नगरमधील रहिवासी दिनेश पाटील हा तरुण रविवार ता.२५ रोजी मोटरसायकलीवर गावाकडे येत असताना त्याच्या गळ्यावर मांज्यामुळे गंभीर जखम झाली नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेत त्याला उपचारासाठी शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. जखम एवढी गंभीर होती की श्वासनलिकेपर्यंत गळा कापला गेला होता डॉक्टरांना त्याच्यावर लागलीच शस्त्रक्रिया करावी लागली आज त्याची प्रकृती स्थिर आहे पण आपल्या निष्काळजीपणामुळे कोणाचा जीव जाऊ शकतो याची समज ठेवणे गरजेचे आहे. मांजा विक्रेत्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जखमी दिनेशचे नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.
आठ दिवसात दुसरी घटना वाहन चालवताना सुरक्षितता बाळगावी
गेल्या आठ दिवसात ही दुसरी घटना घडली आहे आठ दिवसापूर्वी धुळे पुलावरून गावाकडे येत असताना मालेगाव रोडवरील रहिवासी सैन्यदलातील जवान भूषण श्रीराम पाटील यांच्या मानेला मांजाचा फास् पडला ते काढण्यासाठी त्यांनी हात पुढे केले असता त्यांच्या हातांना गंभीर जखमा झाल्या आहेत त्यामुळे या घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी तात्काळ मांजा विक्रेत्यांवर कारवाई करावी.