चाळीसगाव ; बायपासवरील हॉटेल प्रांजल येथे शुक्रवार ता.२३ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास जुगारअड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून पोलिसांनी तेथे धाड टाकली मात्र त्याठिकाणी सोशल क्लब सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले त्यामुळे पोलिसांना कुठलीही कारवाई न करता खाली हात परतावे लागले. याबाबत प्राप्त माहिती अशी की, शुक्रवार ता.२३ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली बायपास वरील हॉटेल प्रांजल येथे जुगार सुरू आहे त्यावरून पोलिसांनी त्याठिकाणी तपासणी केली असता काहीजण पत्ते खेळताना मिळून आले मात्र त्यांच्याकडे सोशल क्लबची रितसर परवानगी होती तसेच त्या ठिकाणी कुठलीही रोख रक्कम मिळून न आल्याने पोलिसांना कारवाई न करता तेथून परतावे लागले.
सदरील कारवाई कुणाच्या सांगण्यावरून होती का?चाळीसगावात अनेक अवैध धंदे सुरूच आहे. सोशल क्लब शहरात अनेक आहे मात्र नियम न पाळता अनेक सोशल क्लब सुरू आहेत. तर काही क्लबधारक सोशलच्या नावाखाली वरील मजल्यावर तीन पत्तीसारखा अस्सल जुगार अड्डा चालवतात तसेच रात्रीची परवानगी नसताना सोशल चालवित आहे त्यामुळे ते अवैध ठरेल.याठिकाणी पोलीस कारवाईसाठी आल्यानंतर उपस्थितांनी आमच्यावरच कारवाई का असा प्रश्न करत शहरात आणखीन काही सोशल क्लब सुरू आहेत त्यांवर कारवाई का नाही. असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला.