चाळीसगाव ; शहरातील धुळे रोडवरील माधवनगर येथे बंद घराचे कुलूप तोडून कपाटातून २ लाख ५२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास झाल्याची घटना ता.२५ रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीसात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, माधव नगर मधील रहिवासी भारत सुलतान संसारे यांच्या मुलाच ता.२६ फेब्रुवारी रोजी लग्न असल्याने ते ता.१५ पासून घर बंद करून कुटुंबीयांसोबत लग्नानिमित्ताने जळगाव येथे होते. आज स.९.३० वा. सुमारास त्यांना शेजारच्यांचा फोन आला घराचा कडी कोयंडा तुटलेल्या अवस्थेत आहे. त्यावरून संसारे आज आले असता ते पोलिसांसोबत घराची पाहणी करण्यासाठी गेल्यानंतर घराचा कडी कोयंडा तुटलेला होता आत जाऊन बघितल्यावर संसार उपयोगी सर्व साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले होते. कपाटातील ड्रावर उघड्या स्थितीत होते त्यात ठेवलेले २ लाख रोख व ५२५०० रुपयांचे चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ५२ हजार ५०० रुपयांचा एकूण ऐवज चोरीस गेल्याची त्यांना खात्री झाली कुणीतरी घरात चोरी केली. याप्रकरणी भारत संसारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलिसात अज्ञात चोरट्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.