चाळीसगाव ; शहरातील बायपासवर असलेल्या हॉटेल प्रांजल परिसरात रविवार ता.२५ रोजी रात्री ९ वा. सुमारास जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन रेड केली १६ जुगाऱ्यांवर कारवाई करत २,८२,९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गेल्या तीन दिवसात या ठिकाणी दुसरी रेड झाल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, रविवार ता.२५ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली हॉटेल प्रांजल परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये सोशल क्लबच्या नावाखाली जुगार खेळल्या जात आहे त्यावरून पोलिसांनी तेथे जाऊन खात्री करत असताना त्या खोली जवळील खिडकीतून खेळणाऱ्यांपैकी कुणाचा आवाज आला ‘मेरी ५०० की ब्लाइंड’असे बोलत हातात तीन पत्ते धरलेला होता. सदर ठिकाणी ९.३० वा. कारवाई करताना पोलिसांनी विचारले सदरली क्रम कोणाचा आहे त्यावर प्रवीण विलास गोत्रे याचा असल्याचे समजले काउंटरवर संजय रतन गायकवाड हा मॅनेजर असल्याचे समजले तसेच ओम नमः शिवाय सोशल कल्चर ऍक्टिव्हिटी सेंटर, धुळे या नावाने क्लब सुरू होता त्यांच्याकडे कुठलेही कागदपत्रे आढळून आले नाही. तेथील इसमांच्या हातात तीन पत्ते व वेगवेगळ्या रंगांचे कॉईन दिसून आले. मॅनेजर ने सांगितले की खेळण्यासाठी येणाऱ्या लोकांकडून पैसे घेऊन त्यांना कॉइन देत हा खेळ खेळला जातो त्यावेळी जुगार खेळणाऱ्यांकडून ८२ हजार ९७० रुपयांचे कॉईन व २ लाखाची चारचाकी वाहन असा एकूण २,८२,९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी वरील जुगार खेळणाऱ्यांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ चे कलम ४,५,१२(अ) प्रमाणे पुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
तीन दिवसात दुसरी कारवाई पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद पण….?
चाळीसगावात अनेक सोशल व झन्ना मन्ना क्लब आहेत. सोशल क्लब यांना नियमावली असते त्या ठिकाणी त्यात क्लबचे सभासदच खेळू शकतात तसेच त्यांना वेळेचे बंधन असते. मात्र त्याचा दुरुपयोग करत सोशलच्या आड खऱ्या अर्थाने जुगार अड्डे चालतात नियमात नसल्यामुळे ते जुगार अड्डेच समजले जातील काही ठिकाणी आजही सोशल नावाचे जुगार अड्डे सुरूच आहेत याबाबत पोलिसांना कुठलीही गोपनीय माहिती मिळत नसेल का यावर आश्चर्य व्यक्त होत आहे.