चाळीसगाव ; शहर पोलिसांनी बुधवार ता.१८ रोजी सकाळी ११ वा. सुमारास शहरातून वाहतूक होणारा ३७ लाख ७५ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे याप्रकरणी वाहन चालक व वाहन मालक यांच्यावर चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, बुधवार ता.१८ रोजी शहर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली शहर हद्दीतून आयशर (क्रमांक एमएच ०४ एल क्यू २५४३) या वाहनातून प्रतिबंधित असलेल्या गुटक्याची वाहतूक होत आहे.अशी माहिती मिळताच पोलीस पथक तयार करून भडगाव रोडवर ओझरजवळ गस्त घालत असताना पोलिसांना वरील क्रमांकाचे वाहन आढळून आले वाहन चालकाने सुरुवातीला उडवा उडवीचे उत्तर दिले.नंतर त्याचे नाव विचारले असता शहजाद अहमद मोहम्मद याकूब रा.गुजरात असे सांगितले.वाहन मालकाचे नाव बाळू शिंगाडे रा.धुळे असे सांगितले. सदरील माहिती पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला देऊन सदरील कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत पोलिसांना ३७ लाख ७५ हजार २०० रुपयांचा विमल गुटखा, सुगंधित सुपारी पकडण्यात यश आले आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले, पोहेका योगेश मांडोळे, पोका विलास पवार, ज्ञानेश्वर पाटोळे, दत्तू साळवे, विकास पाटील यांचा समावेश होता. वरील पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद आहे.
सीलबंद वाहनातून वाहतूक होणाऱ्या गुटख्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळते पण चाळीसगावात सर्वत्र खुलेआम विक्री होणाऱ्या गुटख्याची माहिती शहर पोलिसांना मिळत नसेल यावर आश्चर्य व्यक्त होत आहे.