चाळीसगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील दहिवद फाट्यावर मालेगाव येथील दुचाकीस्वारला चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत दि.३/५/२५ रोजी अपघात झाला व त्या रुग्णाचा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला अशी माहिती कुटुंबीयांनी इन्शुरन्स कंपनीला दिली इन्शुरन्स कंपनीने खोलवर तपासणी केली असता हा सर्व इन्शुरन्सचा लाभ घेण्यासाठी बनाव असल्याचे निष्पन्न झाले तर या प्रकरणात मृताच्या कुटुंबीयांसहित, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी मंदार करंबळेकर व मेहुनबारे पोलिसातील ४ पोलीस कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, दि.३/५/२५ रोजी विमाधारक राजेंद्र शालिंदर जाधव यांच्या कथित अपघाती मृत्यू बाबत श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनी लि. चा ५० लाख रुपयांचा पर्सनल एक्सीडेंट विम्याचा दावा प्राप्त झाला. हा दावा श्रीमती अरुणा राजेंद्र जाधव यांनी सादर केला होता या दाव्यात असे नमूद करण्यात आले होते की दि.१९/४/२५ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता मृतक राजेंद्र शालंदर जाधव हे त्यांची मोटरसायकल क्र. एम एच ४१ बीक्यू २८१७ हिचे वरून मोटरसायकलवर पाठीमागे बसलेला संभाजी शिवाजी पाटील याच्यासह दहिवद येथून मालेगावकडे जात असताना काळया रंगाची थार क्र. एम एच १९ डीव्ही ०५०५ यांनी त्यांना धडक दिली या अपघातात राजेंद्र जाधव यांना गंभीर दुखापत झाली व त्यांचा ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव येथे मृत घोषित करण्यात आले या अपघाता संदर्भात एफआयआर क्र.८६/२०२५ असा मेहुनबारे पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला होता. ही एफ आय आर मयत चालवीत असलेल्या मोटरसायकलवर मागे बसलेला संभाजी पाटील रा. सोयगाव यांनी नोंदविली होती इन्शुरन्स कंपनीला हा दावा प्राप्त झाल्यानंतर त्यांनी अधिक चौकशीसाठी ब्ल्यू स्पाय यांना चौकशीसाठी पाचरण केले. या कंपनीच्या अधिकाऱ्याला चौकशी करत असताना अनेक गंभीर विसंगती आढळून आल्या ज्यामुळे सदर दावा स्पष्टपणे बनावट व फसवणुकीचा असल्याचे निदर्शनात आले चौकशी दरम्यान हे अधिकारी जेव्हा मृत राजेंद्र शालिनी तर जाधव यांच्या मृत्यू प्रत्यक्षात ता.२३/२/२४ रोजी यकृतच्या गंभीर आजारामुळे झाला होता कारण ते दीर्घकाळ मद्यपान करणारे होते व आरोग्याशी संबंधित गुंतागुंत होती तसेच चौकशी अधिकारी जेव्हा मृताच्या घरी भेट दिली असता भिंतीवर राजेंद्र शालंदर जाधव यांचा फोटो लावलेला आढळला त्यावर मृत्यू दि.२३/२/२४ अशी नमूद होती म्हणजेच तो अपघाताच्या दि.१९/४/२५ च्या खूप आधीचा आहे यावरून दि.१९/४/२५ रोजी अपघात मृत्यू झाल्याची कथा पूर्णपणे खोटी असल्याचे स्पष्ट झाले. तसेच ग्रामपंचायत इकडून मृत्यूची नोंद तपासली असता आश्चर्यकारकरीत्या असे आढळले की मृत्यूची नोंद ग्रामपंचायत मृत्यू नोंदणी रजिस्टरमध्ये करण्यात आलेली नाही याची पुष्टी दि.१२/२/२६ माहिती अधिकारात झाली तसेच मृतकाच्या विविध कागदपत्रांमध्ये भिन्न पत्ते दिसून आले. मृताच्या आधार कार्ड व उद्यममध्ये मालेगाव धुळ्याचे असे वेगवेगळे पत्ते दिसून आले.त्यामुळे इन्शुरन्स कंपनीचा संशय अधिक दृढ होत गेला श्रीराम इन्शुरन्स व्यतिरिक्त मृतक राजेंद्र यांच्या नावावर इतर १० विमा कंपन्यांकडून साधारण व जीवन विमा पॉलिसी घेण्यात आल्याचे दावे करण्यात आले आहे. यावरून हे स्पष्ट दिसून येते की, राजेंद्र शालिंदर जाधव यांच्या कथेत अपघाताची व मृत्यूची संपूर्ण बनावट कथा तयार करून यामध्ये नोंदी फेरफार व पुराव्यांची बनावट निर्मिती करण्यात आली हे सर्व श्रीमती अरुणा राजेंद्र जाधव तसेच तक्रारदार संभाजी शिवाजी पाटील व महिंद्रा थार वाहन क्र एम एच १९ डीव्ही ०५०५ चे चालक-मालक यांनी संगममताने केलेले आहे. तसेच चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात मृत नसलेल्या व्यक्तीचे बनावट कागदपत्रे बनविणारे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी चाळीसगाव मंदार करंबळेकर तसेच या गुन्ह्यात पोलीस ठाण्यात खोटी नोंद करणारे पोलीस कर्मचारी पो. महेंद्र पाटील, रवींद्र एकनाथ बत्तीशे, सचिन अशोक निकम, सुनील अशोक निकम यांच्यावर मेहुनबारे पोलिसात बीएनएस २०२३- ३१८(४)३१८(२)३३६(२)३३८,३३६(३)३४१(१)३४०(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील आरोपींना अटक करण्यात आली असून आज दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा बापू रोहम हे करीत आहे.
चाळीसगावात इन्शुरन्सचे पैसे उकळणारे रॅकेट उघडकीस
हा प्रकार अतिशय गंभीर तसेच अनेक इन्शुरन्स कंपन्यांना गंडा घालणारे दलालांचा आहे. आश्चर्य म्हणजे चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी मंदार करंबळेकर यांच्यासारखा मोठा अधिकारी असल्या प्रकरणात सामील आहे. वरील प्रकारावरून याआधी असे मृतांच्या नावावर दलालांनी अनेक बनावट कागदपत्र बनवली असेल यात मात्र शंका नाही. ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी चाळीसगाव मंदार करंबळेकर यांच्या कार्यकाळात इन्शुरन्ससाठी बनविलेली कागदपत्रांची चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.