चाळीसगाव ; अवैध वाळू उपसाबाबत जळगाव प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी आक्रमक पवित्रात घेत स्वतः नदीपात्रात उतरवून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे जळगाव तालुक्यातील वडनगरी येथे सदरील कारवाई केली आहे. वडनगरी नदी परिसरात तीन तासाहून जास्त वेळ पाळत ठेवून नदीपात्रातून वाळू काढण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री जाळी आणि दोरखंड शोधून काढत नष्ट केले आहे. तसेच परिसरात अवैध वाळू उपशाबाबत हालचाली आढळून आल्यास संपर्क करण्याचे आवाहन केले आहे यामुळे या पथकाचे कौतुक होत आहे.
चाळीसगावात लाभलेले प्रांताधिकारी प्रमोद हिले यांच्याकडून देखील गीरणा परिसरात सुरू असलेले अवैध वाळू उत्खननावर कारवाई करत त्यांनी देखील तालुक्यात महसूलचे सक्षम अधिकारी आहेत हे कारवाई साठी का होईना दाखवावे मेहुनबारे परिसरातील गिरणा नदी पात्रातून आजही शेकडो ब्रास अवैध वाळू उपसा सुरू आहे. जामदा रहिपुरी दरम्यान जेथून वाळूचा ठेका सुरू होता त्या ठिकाणाहून आजही वरील कारवाईप्रमाणे वाळू काढण्याची पद्धत सुरू आहे. पिलखोड, दसेगाव, मेहुनबारे, रहीपुरी, जामदा या ठिकाणाहून अवैध वाळू उपसा दररोज सुरू आहे. अनेक व्हाईट कॉलर ह्या व्यवसायात असल्याने महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन कारवाई करण्यास धजावत नसल्याचे चित्र दिसते. विशेष म्हणजे अवैध वाळू वाहतूक गिरणा परिसरातून व भडगाव मार्गे केली जाते वाळू माफिया मेहुनबारे पोलिसांच्या हद्दीतून ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतून शहर पोलीस हद्दीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयावरून शहराच्या मुख्य चौका – चौकातून कुणालाही न जुमानता अवैध वाळू वाहतूक करतात त्यामुळे शंका उपस्थित झाली इतर ठिकाणी असलेल्या महसूलच्या अधिकाऱ्यांना जे अधिकार आहेत तेच अधिकार चाळीसगाव महसूल अधिकाऱ्यांना आहेत मग कारवाई का नाही? याचा अर्थ असा तर नाही ना की,चाळीसगाव तालुक्यात कुठूनच अवैध वाळू उपसा व वाहतूक होत नाही.चाळीसगाव प्रांताधिकारी प्रमोद हिले यांनी आपल्या अधिकारांचा वापर करत अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. चाळीसगाव प्रांताधिकार्यांनी जर कुणाला न घाबरता कारवाई केल्यास त्यांचे देखील कौतुक करत आम्ही बातमी प्रसिद्ध करू.